छत्रपती संभाजीनगर :शहरातील रामनगर भागात दोन मित्रांनी मिळून एका मित्राची चाकूने भोसकून हत्या केली आहे. ही घटना दिवाळीच्या दिवशी घडली. या घटनेचा मनाचा थरकाप करणारा सीसीटीव्ही समोर आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.