शहादा: म्हसावद येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री घडली
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री घडली. याबाबत म्हसावद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सजन मदन शिरसाठ (५५), असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शेतात नांगरटी करून येतो, असे सांगत सजन शिरसाठ घराबाहेर पडले होते. परंतु बराच वेळ ते घरी आले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊ आत्महत्या केल्याचे दिसून आले.