साक्री: पिंपळनेर येथे प्रभाग २-ब मधील एका जागेची निवडणूक प्रक्रिया स्थगित; १९ जागांसाठी होईल मतदान
Sakri, Dhule | Nov 27, 2025 पिंपळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग २-ब मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार कुसुमाबाई खंडू पाथरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाल्याने निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या प्रभागातील एका सदस्य पदाच्या जागेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, नगरपरिषदेच्या २० पैकी १९ जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, छाननी व माघार या सर्व पूर्वनियोजित टण्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी प्रभाग २-ब