भंडारा: विष प्राशनकर्त्या २२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ; मऱ्हेगाव येथील घटना
एका २२ वर्षीय महिलेने विष प्राशन केल्याची घटना उघडकीस येताच कुटुंबीयांनी तिला प्राथमिक उपचारासाठी पलांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पूजा अमोल भेंडारकर (२२) रा मर्हेगाव असे घटनेतील मृतक महिलेचे नाव आहे.