धुळे: बाजार समिती बैल बाजाराला मंदीचा जोरदार तडाखा, बळीराजाच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर!
Dhule, Dhule | Sep 30, 2025 राज्यातील अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता बैलजोड्या विकण्याचं संकट आलं आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक शेतकरी बैल विक्रीसाठी आले, मात्र ऊसतोडणी बंद असल्याने मागणी घटली. अपेक्षित किमतीपेक्षा तब्बल १५ हजारांनी कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. पीक निसर्गाने हिरावलं आणि दावणीचा आधारही कवडीमोल झाला. या दुहेरी संकटातून बळीराजाला सरकार कधी दिलासा देणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.