धुळे: पैसे डबल नाही, तर मारहाण आणि लूट!; पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांचे आवाहन
Dhule, Dhule | Oct 18, 2025 धुळे तालुक्यात सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींच्या माध्यमातून नागरिकांची लूट करणारी टोळी सक्रिय आहे. इंस्टाग्राम, फेसबुकवर काळी हळद, नागमणी किंवा पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून अजनाळे-हेंकलवाडी परिसरात बोलावून मारहाण व लूट केली जाते. अशा अनेक गुन्ह्यांची नोंद झाली असून पोलिसांनी सावधानतेचे फलक लावले आहेत. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी केले आहे.