खुलताबाद: ऑनलाइन निवडणूक प्रक्रिया सुरु पण उमेदवार ऑफलाइन! दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज नाही,खुलताबाद नगर परिषदेत शांतता
खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, यावर्षी ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे नगरपरिषद कार्यालयात अर्जांची ऑफलाइन विक्री बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीदेखील एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. इच्छुक उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरूनच अर्ज भरावा लागणार आहे. पारदर्शकता आणि सुलभता यासाठी हा निर्णय घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ यांनी सांगितले.