भंडारा तालुक्यातील बेला येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, दुकानाच्या पायऱ्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या यशदा संजय गाढवे (वय १६) या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. माजी जिल्हा परिषद सभापती संजय गाढवे यांची एकुलती एक मुलगी असलेली यशदा ही १५ जानेवारी रोजी साहित्य आणण्यासाठी दुकानात गेली होती, मात्र अचानक पायऱ्यांवरून तोल गेल्याने ती जमिनीवर कोसळली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.