जळगाव शहरातील शासकीय आयटीआय परिसरातील रस्त्यालगत लावल्या जाणाऱ्या चार चायनीज हातगाड्यांना काही टवाळखोरांनी कारण नसताना आग लागल्याची घटना सोमवारी १९ जानेवारी रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत गाड्यांवरील साहित्य, टेबल आणि खुर्च्या जळून खाक झाल्या असून गरिबांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे.