शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2025 -- 2026 मधील धान खरेदी करिता शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आली होती. परंतु सदर कालावधीत ऑनलाइन शेतकरी नोंदणी पुरेशी न झाल्यामुळे शासनाकडून 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.