गुहागर: वीज महसूल वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल पाटपन्हाळे येथे कर्मचाऱ्यांचा वरिष्ठांकडून गौरव
वीज महसूल वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल गुहागर महावितरण उपविभागीय कार्यालय अंतर्गत वीज कर्मचाऱ्यांचा सन्मान वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी सायंकाळी चार वाजता पार पडला. या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता कैलास लवेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.