सावंतवाडी: धाकोरे होळीचे भाटले ते बांदिवडेवाडीपर्यंत जाणारा सार्वजनिक रस्ता तब्बल ३५ वर्षांनंतर अखेर मोकळा : तहसीलदार श्रीधर पाटील
धाकोरे होळीचे भाटले ते बांदिवडेवाडीपर्यंत जाणारा सार्वजनिक रस्ता तब्बल ३५ वर्षांनंतर अखेर मोकळा करण्यात आला आहे. धाकोरे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी करण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षाचे ग्रामस्थांचे कष्ट आता मिटणार आहेत. रस्ता मोकळा झाला आहे असे सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज गुरुवार १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता माहिती देताना सांगितले.