जालना: अतिवृष्टीमुळे विहीर खचली आणि पुलही गेला वाहून; आजपर्यंत पचंनामा न केल्याने आंदोलनाचा इशारा
Jalna, Jalna | Sep 18, 2025 जालना तालुक्यातील वरुड परिसरात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. त्याचा फटका स्थानिक शेतकर्यांना बसला आहे. या पूरपरिस्थितीत गावातील अनेक शेतकर्यांच्या विहिरी खचल्या तर रस्त्यांचा व पूलांचा मोठ्या प्रमाणावर र्हास झाला आहे. तरी देखील आजपर्यंत कुणीही त्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आले नसल्याने आंदोलनाचा इशारा शेतकर्यांनी गुरुवार दि. 18 सप्टेंबर 2025 रोज सायंकाळी 6 वाजता दिला आहे. वरुड येथील शेतकरी रेणुका गणेश म्हस्के व गंगासागर शिवाजी खोतकर यांच्या शेताचे नुकसान झाले.