पुणे जिल्ह्यातील मौजे खेबडशेत नारोडी येथे अज्ञात चोरट्यांनी जुन्या घरावर हात साफ करत तब्बल दोन लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.फिर्यादी संजीव दगडू पिंगळे, वय पंचावन्न, रहिवासी खेबडशेत नारोडी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 23 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 24 ऑक्टोबरच्या पहाटे साडेचार वाजेदरम्यान घडली.