भंडारा: भंडारा जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियान ; जिल्हा आरोग्य अधिकारी सोमकुवर
"स्वस्थ नारी, सशक्त परिवार" या अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांनी सर्व महिलांना आवाहन केले आहे की, आपली संपूर्ण आरोग्य तपासणी आपण आरोग्य शिबिरांमध्ये नक्की करून घ्यावी. महिलांचे आरोग्य हे संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्याशी थेट निगडित असल्याने त्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे.