बुलढाणा: पश्चिम कोथळी बिट मधील वन जमिनीतून मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्यावर कारवाईची मागणी@
मोताळा रेंज मधील पश्चिम कोथळी बिटच्या कंपार्टमेंट नं.482,483 मधील वन जमिनीवर मोठया प्रमाणात मोठ-मोठे खड्डे करून मुरूम गौणखणीजाचे अवैध उत्खनन करून विना परवाना मोठया प्रमाणात वाहतुक करीत आहे.हे काम वनपाल व वनरक्षक यांच्या आर्शिवादाने जोरात सुरू आहे. दोषी वन कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीने बीएफओ बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.