भंडारा शहरातील एसटी महामंडळाच्या मुख्य बसस्थानकावरील महिला प्रसाधनगृहात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी प्रसाधनगृहातील शौचालयात एक महिला बेशुद्धावस्थेत पडलेली असल्याचे पाहताच तात्काळ वाहतूक निरीक्षकांना याची माहिती दिली. वाहतूक निरीक्षकांनी महिला सुरक्षा रक्षकासोबत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान संबंधित महिला मृत अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.