आज दिनाक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत सकल दिव्यांग सामाजिक संघटना आणि शिवसेना दिव्यांग आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त अशिमा मित्तल यांची भेट घेऊन मुद्दे मांडले. यावेळी मित्तल यांनी दिव्यांगांच्या सर्व समस्या प्राधान्याने मार्गी लावू, असे आश्वासन दिले. पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडलेल्या प्रमुख मागण्या जालना महानगरपालिकेमार्फत दिव्यांगांसाठी असलेला ५ टक्के निधी वेळेवर खर्च करण