यावल येथील न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीसमोर दाखल पूर्व प्रकरण तसेच दिवाणी आणि फौजदारी प्रकरण असे एकूण ४ हजार १८० प्रकरण ठेवण्यात आली होती यापैकी ६०६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व १ कोटी २३ लाख ९६ हजार ८९६ रुपयाचा वसूल या लोकन्यायालयाच्या माध्यमातून झाला आहे.