उमरखेड: पीडिता साठी एकवटले गाव! ढाणकी कडकडीत गाव बंद ठेवून
काल सगळे नवरात्र उत्सवच्या तयारीत असताना वासनांध शिक्षकाच्या अत्याचारामुळे एका १७ वर्षांच्या लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, आरोपीने त्याच्या ट्युशन च्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर आपल्या वासनेचा बळी बनवत आरोपी शिक्षकाने मागील एक वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले आणि जेंव्हा ती गर्भवती राहिली तेंव्हा तिला अघोरी गोळ्या देऊन मृत्यू च्या दारी ढकललं. या घटनेने समस्त ढाणकीवाशी मधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ढाणकी शहर कडकडीत बंद करून निवेदन देण्यात आले.