शिरपूर: तालुक्यातील सामऱ्यापाडा शिवारात गांजा शेती उध्वस्त,12 लाखाचा गांजा जप्त,शिरपूर शहर पोलीस आणि धुळे एलसीबीची कामगिरी
Shirpur, Dhule | Nov 1, 2025 तालुक्यातील सामऱ्यापाडा शिवारात 31 ऑक्टोबर रोजी दुपारी शिरपूर शहर पोलीस आणि धुळे एलसीबीच्या पथकाने गांजा शेती उध्वस्त केली. या कारवाईत सुमारे 12 लाख रुपये किमतीची 600 किलो गांजा झाडे जप्त करण्यात आली.या प्रकरणी शेत मालकाविरुद्ध एनडीपीएस अंतर्गत रात्री साडे वाजेच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जितु शिका-या पावरा रा.वाडी ता.शिरपुर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून करण्यात आली.