वणी: वेकोलिच्या कोळसा खाणीतील तीव्र स्फोटाने घोन्सा हादरले, दगड अंगावर पडल्याने महिला जखमी
Wani, Yavatmal | Dec 24, 2025 वारंवार तक्रारी करूनही घोन्सा खुल्या कोळसा खाणीत होणारे तीव्र स्फोट थांबविण्यात आले नाही. परिणामी मंगळवार २३ डिसेंबर रोजी सायंकाळी स्फोटानंतर खाणीतील दगड परिसरातील शेतशिवारात येऊन पडले. याचवेळी शेतात कापूस वेचणीचे काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर त्यातील एक दगड पडला. त्यात महिलेच्या पायाला जबर दुखापत झाली.