नंदुरबार: मा.खा.डॉ हिनाताईं मुळेच मला पासपोर्ट मिळाला आणि चीनला खेळण्याची संधी प्राप्त झाली : प्रणव गावित (आंतरराष्ट्रीय खेळाडू)
भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करणाऱ्या खेळाडू प्रणव गावित यांचा आमदार निवासस्थानी आज सकाळी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित संसद रत्न माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मा. खासदार डॉ हिना गावित यांच्या प्रयत्नामुळेच मला पासपोर्ट मिळाला आणि चीनला जाण्याची संधी प्राप्त झाली अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणव गावित यांनी माध्यमंशी बोलताना व्यक्त केली.