हिंगणघाट: तरुण,तरुणींनी रोजगारातून स्वतांची उन्नती करून कुटुंबाचे नाव लौकिक करावे :आमदार समिरभाऊ कुणावार
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या पुढाकाराने बिडकर कॉलेज मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या मेळाव्याचे उदघाटन आ: कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार कुणावार म्हणाले की बदलत्या काळात रोजगार व नौकऱ्यांची सर्वांना गरज आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध योजना अमलात आणून रोजगाराची संधी उपलब्ध दिली आहे.