वर्धा: निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची संघटनात्मक बांधणीला गती; केळझर येथे भव्य पक्ष प्रवेश मेळावा संपन्न
Wardha, Wardha | Nov 10, 2025 आगामी काळात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून, शिवसेनेतर्फे संघटनात्मक बांधणी आणि पक्ष विस्तारावर विशेष भर दिला जात आहे. याच तयारीला जोर लावत, शिवसेनेने आता पक्षप्रवेश मेळाव्यांचे सत्र सुरू केले आहे. असे आज 10 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे