भंडारा तालुक्यातील खरबी चेक पोस्टवर महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैध रेतीची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक (क्र. MH 49/CF-2112) पकडला असून, एकूण ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना २७ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली असून, मध्य प्रदेशातील शिवणी येथील ट्रक मालक पवनकुमार येळमाचे (३५) याच्या सांगण्यावरून नागपूर येथील चालक धिरज कमलाकर ढोबळे (३८) हा विनापरवाना १० ब्रास रेतीची चोरी करून वाहतूक करत असताना रंगेहाथ मिळून आला.