कन्नड: शफेपुर गावात गोवंश कत्तल प्रकरणी दोघांवर पिशोर पोलिसांची कारवाई; ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त
आज दि १० नोव्हेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता पिशोर पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली कि कन्नड तालुक्यातील शेफेपूर-पिशोर गावातील हरी मस्जिदजवळ गोवंशाची अवैधरित्या कत्तल करणाऱ्या दोघांवर पिशोर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.या कारवाईत ४६,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलिसांना खात्रीलायक गुप्त माहिती मिळाल्यानंतर पहाटे छापा टाकण्यात आला.