उमरखेड: शहरातील साई श्रद्धा नगर येथुन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले 60 हजार 500 रुपये,अज्ञात चोरट्याविरुद्ध उमरखेड पोलिसात....
फिर्यादी धनंजय नरवाडे यांच्या तक्रारीनुसार 17 ऑक्टोबरला तीन वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीच्या खिशातील नगदी पन्नास हजार रुपये व बस मधील प्रवासी देविदास बरडे यांच्या खिशातील दहा हजार पाचशे रुपये असे एकूण 60 हजार 500 चोरून नेले.या प्रकरणी 17 ऑक्टोबरला सायंकाळी अंदाजे साडेसात वाजताच्या सुमारास उमरखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.