राहुरी: डॉ.तनपुरे कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी नेते संजय पोटे अन् अध्यक्ष अरूण तनपुरेंची खराडजंगी
राहुरी येथील डॉ. बाबुराव बाबुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी नेते संजय पोटे अन् कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्यामध्ये चांगलीच खराडजंगी झाली. आज मंगळवारी दुपारी राहुरी कॉलेज येथे झालेल्या सभागृहामध्ये झालेल्या सभेत कारखाना बंद असताना आपण कारखान्याचे ऑडिट का केले?असा सवाल पोटे यांनी उपस्थित करताच तनपुरे त्यांच्यावर चांगलेच भडकले.