जालना: मेल नर्सेसबाबत लिंगभेद बंद करून शिक्षण आणि रोजगारात समानतेचा हक्क देण्याची मेल नर्स संघटनांची मागणी
Jalna, Jalna | Sep 18, 2025 डीएमईआरच्या भेदभावपूर्ण 80:20 लिंग आधारित नियमाविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून मेल नर्सेसचा संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकार सतत दुर्लक्ष करीत असल्यने गुरुवार दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मेल नर्स बचाव संघटनांनी मोर्चा काढून सरकारचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. महाराष्ट्रतील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून म्हणजेच डीएमईआरकडून सरळसेवा अधिपरिचारिका भरती प्रक्रियेत लागू केल्याने 80:20 लिंग आधारित कोट्याविरोधात मेल नर्सेसमध्ये नाराजी आहे.