आजच्या जागतिक व्यवस्थेत केवळ नैतिकता, आदर्श किंवा सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे कोणताही देश प्रभावी जागतिक नेतृत्व करू शकत नाही. भौतिक, आर्थिक, औद्योगिक व तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या संपन्न असलेले देशच जागतिक घडामोडींचे संचालन करतात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले ते 17 जानेवारी शनिवारला गोंदिया येथील रेलटोली स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवनिर्मित केशव भवनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.