नागपूर ग्रामीण: मिहान परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर वनविभागाने कॅमेरा ट्रॅप लावले
नागपूर शहरातील मिहान परिसरात पुन्हा एकदा बिबट्या फिरताना दिसल्याने परिसरात दहशत पसरली आहे. बिबट्याचा वावर असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मिहानमधील टीसीएस कंपनीच्या परिसराजवळ घडली आहे, जिथे एम्स रुग्णालय आणि इतर अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत.या घटनेनंतर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने पाऊल उचलले आहे. नागपूर वन विभागाने मिहान परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.