एरंडोल: एरंडोल शहरातील नॅशनल हायवे ६ वरील रघुवीर समर्थ बैठक हॉल समोरच्या ट्रॅक्टर अपघातात तरुण ठार, एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
एरंडोल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या नॅशनल हायवे ६ वर रघुवीर समर्थ बैठक हॉल आहे. या हॉल समोरून ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.१९ डी.व्ही.९७१६ घेऊन संदीप गोपाल मराठे वय ३२ राहणार भालगाव ता. एरंडोल हा जात होता. दरम्यान अचानक ट्रॅक्टर वरील नियंत्रण त्याचे सुटले आणि तो ट्रॅक्टर वरून खाली कोसळून अपघात घडला. यात त्याचा मृत्यू झाला तेव्हा याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.