रत्नागिरी : 01 ते 07 ऑगस्ट 2025 दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन...
483 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 1, 2025 बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच महिलांना कुठेही आणि कधीही स्तनपान देण्याच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान “जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह” साजरा करण्यात येतो.याअनुषंगाने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये होते. कार्यक्रमाला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ,रुग्णालय प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. वसिम सय्यद, वैद्यकीय महाविद्यालय चे सहाय्यक प्राध्यापक डॉ.शायन पावसकर,डॉ.आदित्य वडगावकर, जिल्हा माध्यम अधिकारी नामदेव बेंडकुळे,अधिसेविका जयश्री शिरधनकर,पीएचएन माया सावंत तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.