दिनांक 24 ऑक्टोबरला दुपारी चार वाजेच्या सुमारास खाडीपार येथे क्रिकेट टूर्नामेंट चे उद्घाटन माजी सभापती विजय राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदच़द्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तेजेंद्र हरीणखेडे, सरपंच दिनेश टेकाम , उपसरपंच यशवंत कावडे, संचालक प्रदीप येडे, साकेत पालेवार आदी उपस्थित होते.