मावळ: जुन्या भांडणाच्या कारणातून एकावर जीवघेणा हल्ला ; वराळे येथील गंभीर घटना
Mawal, Pune | Oct 1, 2025 जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (२९ सप्टेंबर) दुपारी वरोळे ( ता. मावळ ) येथे घडली.ओंकेश लक्ष्मण मंडलपवाड (२१, वराळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुद्र कांबळे (वराळे), पियुष कुमार (वराळे), प्रतिक ताथळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.