नेर बस स्थानकातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने मार्गी लागणार आहे.यासाठी 60 लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.नेर बस स्थानकातील रस्ता अंदाजे 700 स्क्वेअर मीटर लांबीचा आहे.हा रस्ता उखडला असल्याने चालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.