वर्धा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगुळ यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच ता. २१ रविवारी सायंकाळी ५.३० वाजता सेलू शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. वर्धा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरुवातीपासूनच काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांनी भाजपचे नीलेश कीटे यांच्यावर विजय मिळवला.