श्रीवर्धन: रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी बहरत आहेत..@raigadnews24
दिवाळी संपली असून आत्ता पर्यटनाचा हंगाम सुरु होत आहे. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असणाऱ्या रायगडच्या समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची पहिली पसंती असती. दिवाळीच्या सुट्टीत समुद्र किनाऱ्यांवर मौजमजा करायची, येथील वॉटर स्पोर्टचा आनंद लाटायचा आणि सी फुड म्हणजे सुरमयी, पापलेट, कोळंबीवर ताव मारण्यासाठी पर्यटक रायगडमध्ये येत असतात. पावसाळ्याचे चार महिने येथील पर्यटन समुद्राच्या धोकादायक लाटांमुळे बंद असत.