वर्धा: रेतीची कृत्रिम टंचाई व लूट;'लाल फीतशाही'विरोधात ट्रक चालक-मालक आक्रमक:प्रशासनाच्या दिरंगाईमुळे घराचे बजेट लाखांनी वाढले.
Wardha, Wardha | Oct 16, 2025 वर्धा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून रेती घाटांवरून कृत्रिम तुटवडा आणि सामान्य नागरिकांची लूट सुरू असल्याचं चित्र आहे. प्रशासन एप्रिल-मे मध्ये घाट सुरू करतं आणि जूनमध्ये बंद करतं. याचा थेट परिणाम म्हणून नागरिकांना अवैध, गुणवत्ताहीन रेती दुप्पट दराने खरेदी करावी लागत आहे, ज्यामुळे घर बांधणीचं बजेट दोन ते तीन लाखांनी वाढत आहे. असे आज 16 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे