सिंधुदुर्ग: सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीत "कुष्ठरुग्ण शोध अभियान (LCDC)" राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश समाजातील निदान न झालेले नवीन या अभियानाचा मुख्य उद्देश समाजातील निदान न झालेले नवीन कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना तात्काळ बहुविध औषधोपचाराखाली (MDT) आणणे, संसर्गाची साखळी खंडित करणे आणि कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करणे हा आहे.