खुलताबाद नगरपरिषदेत भाजपला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या चारही नगरसेवकांवर लवकरच निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती आज दि १७ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता काँग्रेस नेते अनिल श्रीखंडे यांनी दिली.दि.१६ जानेवारी रोजी झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षला पाठिंबा देत नवनाथ बारगळ यांच्या बाजूने हात उचलून मतदान केले होते.या घटनेनंतर काँग्रेस शहराध्यक्षासह संबंधित चारही नगरसेवकांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे श्रीखंडे यांनी स्पष्ट केले.