समुद्रपूर: गृहकर कमी करण्याची शहरवासीयांची नगरपंचायतीकडे निवेदनातून मागणी
समुद्रपूर शहरातील नगरपंचायतींच्या वतीने गृहकरात वाढ केल्याची नागरिकांकडून ओरड सुरू आहे.हि गृहकर कमी करण्याच्या मागणीसाठी नागरीकांनी नगरपंचायतमध्ये जाऊन लवकरात लवकर गृहकर कमी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. गृहकर कमी करण्याबाबत मीटिंग मध्ये ठराव घेऊ असे तोंडी आश्वासन मुख्यअधिकाऱ्यांनी दिले यावेळी नगराध्यक्ष योगिता तुळणकर, उपनगराध्यक्ष बाबाराव थुटे, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, अशोक डगवार, प्रदिप डगवार, प्रदिप कुलकर्णी आदिसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.