भोकरदन: पारध व पिंपळगाव रेणुकाई येथे अवैध दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 4वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी पारद गावात व पिंपळगाव रेणुकाई येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन अड्ड्यांवर छापा टाकत देशी दारूच्या बाटल्या व 70 हजार रुपयाची दुचाकी असा एकूण 75 हजार रुपयांचा मध्यमान जप्त करत रईस तडवी व अमोल बर्डे यांच्या विरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतले आहे,सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक माने यांच्या पथकाने केली आहे.