पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. विजया राजेश नंदुरकर (ठाकरे) यांनी आज 6 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास प्रभाग क्रमांक ९ मधील बेलघाटा वार्डात प्रत्यक्ष जाऊन जनसंपर्क दौरा केला. यावेळी प्रभागातील नाल्या कचऱ्याने तुडुंब भरून उपसल्या असल्याचे निदर्शनास येताच, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित कर्मचाऱ्यांना पाचारण करून तत्काळ साफसफाईचे आदेश दिले व स्वतः थांबून काम सुरू करून घेतले.