यवतमाळ: जिल्हाधिका-यांकडून पुसद येथे पीक नुकसानभरपाई मदतवाटपाचा आढावा
पीकनुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी संबंधित खातेदारांच्या याद्या दोन दिवसांत अपलोड करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पुसद येथे दिले. पुसद येथील श्री शिवाजी विद्यालय येथे नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईचे अनुदान मदत वाटपाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.