जाफराबाद: मनोज जरांगे पाटील यांना धमकी येताच जाफराबाद तालुक्यातील शेकडो मराठा समाज बांधवांनी आंतरवाली सराटी येथे घेतली धाव
आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील सिपोरा, अंभोरा, वरुड ,जाफराबाद शहर यासह संपूर्ण तालुक्यातील शेकडो मराठा समाज बांधवांनी आंतरवाली सराटी येथे एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे,कारण मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देत 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे,यामध्ये पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतल्या असून काळजीपोटी जाफराबाद तालुक्यातील मराठा बांधवांनी आज आंतरवाली गाठत पाटलांची भेट घेतली आहे.