भडगाव: ऐक्य व श्रद्धेचे संगम असलेल्या लोण पिराचे येथे मोहरम उत्साहात साजरा,
कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या लोण पिराचे येथे आज मोहरम च्या दिवशी दि.६ जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता ताजिया मिरवणुक मोठया उस्तवात साजरी करण्यात आली, ताजिया मिरवणुक व विसर्जन मध्ये लोणसह परीसरातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते, हिंदु मुस्लीम बांधवांनी दर्शना साठी गर्दी केल्याने सर्वधर्म समभाग चा प्रत्यय येथे येत होता, हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणुन लोण पिराचे येथील दर्गा प्रसिध्द आहे, हिंदु मुस्लीम एकत्र येत येथे वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न करतात,