लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय येथे दक्षता जनजागृती सप्ताह 2025 चा पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी भ्रष्टाचार विरोधी प्रतिज्ञा सर्व अधिकारी व अंमलदार यांनी घेतली. भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी पालघर जिल्ह्यात पथके रवाना करण्यात आले. भ्रष्टाचार भेटूया देश पुढे नेऊया या घोषवाक्य ची माहिती देऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.