चाळीसगाव: चाळीसगावात मोठी कारवाई: १९ वर्षीय तरुणाकडून गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत राऊंड जप्त
चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका १९ वर्षीय तरुणाला गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जीवंत राऊंडसह रंगेहात पकडले आहे. ही कारवाई रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक कोम्बिंग ऑपरेशनसाठी गस्तीवर होते. दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी पहाटे २.२० वाजता पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली